Agobai dhagobai marathi kavita | best marathi kavita for kids

 नमस्कार बालमित्रांनो! आज आपण इयत्ता पहिली मराठी बालभारती मधील पहिली कविता जीच नाव आहे Agobai dhagobai marathi kavita शिकणार आहोत ! या कवितेचे कवी आहेत संदीप खरे यांनी ही कविता अतिशय सुंदर लिहिली आही तुम्हाला नक्कीच आवडेल.

Agobai dhagobai marathi poem for kids या कवितेत कवी संदीप खरे यांनी पाऊस पडतानाचे अतिशय विनोदी शब्दात वर्णन केले आहे.

चला तर मग आपण वाचूया कविता....


Agobai dhagobai marathi kavita for kids

अग्गोबाई ढग्गोबाई लागली कळ

ढगाला उन्हाची केवढी झळ!

थोडी न थोडकी, लागली फार!

डोंगराच्या डोळ्याला पाण्याची धार! ! ॥धृ॥।


वारा वारा गरागरा सो सो सूम...

ढोल्या ढोल्या ढगात ढुम ढुम ढुम...

वीजबाई अशी काही तोर्यामध्ये खडी 

आकाशाच्या पाठीवर चम चम छड़ी !!


खोल खोल जमिनीचे उघडून दार

बुड बुड बेडकाची बडबड फार !

डुंबायला डबक्याचा करूया तलाव

साबु - बिबु नको.. थोडा चिखल लागावं !!

                 - संदीप खरे


काय तर मग बालमित्रांनो कशी वाटली Agobai dhagobai marathi kavita ! आवडली न!

Comments